ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांना विद्यापीठाचा लघु संशोधन प्रकल्प मंजूर

0
ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांना विद्यापीठाचा लघु संशोधन प्रकल्प मंजूर

उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत बालाजी पेन्सलवार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने लघु संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ‘स्ट्रीमलाइनिंग लायब्ररी ऑपरेशन्स : द इंटिग्रेशन ऑफ आप्लिकेशन सॉफ्टवेअर विथ लायब्ररी सर्विसेस’ या अत्यंत नाविन्यपूर्ण विषयावर संशोधन कार्य करण्यासाठी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!