उदयगिरीत सामाजिक संदेश देत होळी साजरी.

0
उदयगिरीत सामाजिक संदेश देत होळी साजरी.

उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामाजिक संदेश देत होळीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना अस्वच्छतेची, अंधश्रद्धेची, बेरोजगारीची, भ्रष्टाचाराची, गुन्हेगारीची, धर्मांधतेची, जातीयवादाची, प्रांतवादाची, भाषावादाची, भोगवादाची, चंगळवादाची, विलासी प्रवृत्तीचीची,
नकारात्मक विचारांची होळी करण्यासाठीचा संदेश देण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होंकरणे, डॉ. निळकंठ वगशेट्टे, डॉ. बाळासाहेब दहिफळे, डॉ. जयप्रकाश पटवारी, डॉ. संतोष मुळे, प्रा. प्रवीण अंबेसंगे, क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंडे, डॉ. विश्वंभर गायकवाड, डॉ. गौरव जेवळीकर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!