रेनापुर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य अपात्र

0
रेनापुर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य अपात्र

लातूर (एल.पी.उगीले)- रेनापुर तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, सदस्य यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत दाखल न केल्याने जिल्हाधिकारी यांनी साठ ग्रामपंचायत सदस्यांचे,सरपंच,उपसरपंच यांचे सदस्यत्व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 10(1अ) व कलम 30 (1अ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी लातूर यांनी रद्द करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमची कलम 16 नुसार सदरील अपात्र उमेदवारांनी धारण केलेल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सरपंच, सदस्य पद तात्काळ प्रभाव आणि रिक्त झाल्याचे आदेश घोषित केले आहेत.
रेनापुर तालुक्यातील( अपात्र ग्रामपंचायत सदस्य) गोढाळा -इंद्रायणी बताने , खरोळा- शिकलकर तमन्ना, गरसुळी – बुकतर कुसुम श्रीहरी ,वाल्मीक प्रभू घोडके ,कामखेडा- वाघमारे शाहू तुकाराम, सेलू खुर्द -निकिता वैजनाथ कांबळे, दिवेगाव – डुकरे रुक्मिणी विनोद ,माकेगाव -कांबळे मीना प्रभाकर, चाडगाव- वाघमारे ललिता सुरेश, वांगदरी- कांबळे मनीषा प्रकाश ,पोहरेगाव- घाटोळे भगीरथ श्रीमंत, कसबे राधा राजेंद्र, राठोड यशोदा किशोर, शेरा – कांबळे सुरेखा अरुण, भुरे बेबी सरोजा बाळासाहेब ,रामवाडी ख -सुरवसे रोहिणी सचिन ,रामवाडी ख -सुरवसे शिवकर्ण दगडू ,लखमापूर – ससाने उषाबाई नागनाथ, जाधव अरुणाबाई रवी, माणूसमारवाडी- सरस्वती बिबीशन तुकणर ,खानापूर – मुदामे वत्सलाबाई विक्रम, मुदामे विष्णू विक्रम, सय्यद (बु )- विद्या गोरखनाथ चिंतलवार , मंदाबाई सोपान भोपळे, धवेली- अंजना लिमराज मेकले, संगीता हनुमंत बोयणे, डिगोळ देशमुख- कदम अजिंक्य अनिल, शाहीर हरिश्चंद्र श्रीपती, राठोड अंजना संजय, देणे शीला बाई सोनेराव, उपआदिमाया कैलास,हारवाडी- हरवाडीकर शिखंडी वसंतराव ,गव्हाण- पानाडे दगडूबाई रामचंद्र, समसापूर- काळे सुरेखा बालाजी ,टाकळगाव -जोगदंड कालींदा लिंबराज, गडदे विमलबाई मनोहर , नाईकवाडे समाधान जगन्नाथ, कोष्टगाव -जराडे भाग्यशाला ज्ञानदेव, होळंबे व्यंकट भगवानराव,निवाडा -कस्पटे सुरेखा विठ्ठल, गायकवाड उषा महादेव , कालिदास महादेव कांबळे ,मुरढव- कांबळे राधा बळीराम ,मुसळेवाडी -किडमिडे नारायण न्यानोबा, मोरवड -घोडके मयूर भारत ,वने अश्विनी ओम प्रकाश ,कारेपूर -साळवे संजीवनी शिवाजी, कांबळे धनराज शिवाजी, भोकरंबा- शेख हुजूर पाशा चंदाजी ,अंतिकाबाई बबन गोरे, आरजखेडा -अभिषेक हाऊसेराव जोगदंड ,आशा सतीश जोगदंड ,विमलबाई लक्ष्मण माळगे , मोटेगाव -रामकिशन महादेव मुसळे, कांबळे कमलाबाई तुकाराम ,आनंदवाडी -दत्तात्रय सुदामा कांबळे ,बाळासाहेब धर्मराज बुड्डे, व्हटी सा. -गायकवाड न्यानोबा राम, ईटी (ना)- कस्तुरे रवीकुमार सुदामा, सिंदगाव- चेवले कालींदा अनंत या ग्रामपंचायत सदस्यांचे,सरपंच,उपसरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 10(1अ) व कलम 30 (1अ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी लातूर यांनी प्रपत्र मध्ये नमूद केले नुसार रेनापुर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील 60 उमेदवार सरपंच,उपसरपंच,सदस्य यांची निवड भूलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे आदेशित करत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमची कलम 16 नुसार सदरील अपात्र उमेदवारांनी धारण केलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य पद तात्काळ प्रभाव आणि रिक्त झाल्याची घोषित केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!