दापका येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

0
दापका येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

उदगीर (एल.पी.उगीले) सीमा भागातील कमालनगर तालुक्यातील दापका येथील सरकारी माध्यमिक विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भानुदासराव वासरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शालेय सुधारणा समितीचे अध्यक्ष अंकुशराव वाडीकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर गावातील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक विलासराव जाधव, यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य ,गावातील प्रतिष्ठित नागरिक ,सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थिती होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संजू बिरादार यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी यांच्या सत्कार नंतर अरविंद बिरादर, सचिन शिंदे आणि शेख यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेने ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. संस्कृती ज्ञान दिलेला आहे, ते आम्ही शेवटपर्यंत या शिदोरीचा वापर करून चांगल्या प्रकारे वागू, सर्व शिक्षकांत बद्दल विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून व्यक्त केलेआहे.
विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना अतिशय भावनिक झालेले होते. सचिन शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांच्या जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, आणि भावी जीवनात यशस्वी वाटचाल चालू होण्यासाठी जिद्द, चिकाटी, संयमता विद्यार्थ्यांच्या अंगी असणे गरजेचे आहे.
जीवनामध्ये विनम्रतेला महत्त्व आहे. असे विचार व्यक्त केले. अध्यक्ष अंकुशराव वाडीकर यांनी मनोगतातून शाळेचा शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्धता, शैक्षणिक येणाऱ्या अडचणी, अडचणीत केलेली मात यासंदर्भत मार्गदर्शन केले .सर्वांनी खूप मेहनत घेतली असल्याचे नमूद केले. . विलास जाधव यांनी आपल्या मनोगतून आजचा विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील दुरावत चालले नाते. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जवळचा मित्र असतो. अशा पद्धतीने नातेसंबंध समजावून सांगितले, विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या, सौ राजश्री कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निरोप या शब्दाचा सविस्तर अर्थ सांगितला . भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. संजीव पोतले, राम रावणगावे, राजकुमार बिरादार, विठ्ठल जिरगे, व शाळेतील कर्मचारी, पंढरी भोसले, वसंत विलासपूरे,शेख मुख्तार ,सौ अर्चना शिंदे अतिथी शिक्षिका ललीता भेंडे, सौ स्नेहा बिरादार व विघार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!