अंधश्रद्धेतून मानसिक शोषण – डॅनिअल मस्करणीस

0
अंधश्रद्धेतून मानसिक शोषण - डॅनिअल मस्करणीस

उदगीर (एल.पी.उगीले)
समाजात भोंदू लोकाकडून दैवी दहशतवाद मोठ्या प्रमाणात चालू आहे.भीतीतून अंधश्रद्धा निर्माण होत असते.चमत्कारिक गोष्टीच्या माध्यमातून एखाद्याचे मानसिक शोषण करणे, ही सुद्धा एक अंधश्रद्धाचं आहे. असे मत पुणे येथील आयटी तज्ज्ञ ,विज्ञान व विवेक या विषयाचे अभ्यासक, साहित्यिक डॅनिअल मस्करणीस यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंतर्गत विवेक वाहिनी ही शाखा कार्यरत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर व उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमुख पाहुणे, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विवेक वाहिनी चळवळ ही डोळस दृष्टिकोन निर्माण करते. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील जी पुसट रेषा आहे, ती विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. एखादी कृती करत असताना त्या मागील कार्यकारण भाव लक्षात घेऊन वाटचाल करावी. या उद्देशाने या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे विवेक वाहिनी समितीच्या प्रमुख प्रा.जे.डी.संपाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
पुढे बोलताना मस्करणीस म्हणाले, गरिबीमुळे आज अनेक लोक आरोग्याशी झुंज देत आहेत. हतबल झालेले आहेत. अशा वेळी नाईलाजाने ते भोंदू बाबांच्या आहारी जातात. त्यामुळे माणसाची शारीरिक हानी देखील होत आहे. त्याबरोबरचं धर्माची चिकित्सा प्रत्येकानी स्वतःपासून केल्यास परिवर्तन होणे शक्य आहे. नरेंद्र दाभोळकरांनी विवेकी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.असे सांगत महाविद्यालयातील विद्यार्थी चिकित्सक असून त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत, हे कौतुकास्पद आहे.असेही ते म्हणाले. संवाद बैठकीत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक वाहिनी समितीतील सदस्य डॉ.यु.एस.धसवाडीकर, डॉ.दत्ताहरी होनराव, डॉ.म.ई.तंगावार, ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ तसेच इतर सदस्यांनी प्रयत्न केले. आभार एम.ए. प्रथम वर्षातील विद्यार्थी विक्रम कऱ्हाड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!