महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शहीद दिनाच्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, आयआयटी गुवाहाटी येथील प्रा. प्रशांत पाटील, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. जी. जी. जेवळीकर, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
