आनंद व्यसनमुक्ती केंद्राला डाॅ.प्रसन्न फुटाणे यांची सदिच्छा भेट

0
आनंद व्यसनमुक्ती केंद्राला डाॅ.प्रसन्न फुटाणे यांची सदिच्छा भेट

उदगीर (एल.पी.उगीले)
आनंद व्यसनमुक्ती केंद्र उदगीर येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ मुंबई येथून प्रदीर्घ अनुभव घेवून डाॅ.प्रसन्न फुटाणे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आनंद व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांना व्यसनाधीन झाल्यानंतर बेचैनी होणे ,संशय घेणे ,लोक मारतील असे वाटणे ,लैंगिक समस्या ,कानात आवाज येणे ,मनाला सतत उदास वाटणे ,आयुष्यात उत्साह, रस न राहणे, भीती वाटणे, भूल पडणे ,संभ्रम अवस्था, रात्री झोप न लागणे, स्वतःशीच बडबडणे, काम करण्याची इच्छा न होणे ,मतिमंदत्त्व, वर्तणुकीच्या समस्या ,एकटेपणा एकच विचार मनात पुन्हा पुन्हा येणे, असे आनेक आजार झाल्या सारखीच व्यसनाधीन व्यक्तीला जानवते असे डाॅ.फुटाणे बोलतांना म्हणाले.
यावेळी सर्व सेंटर चे इन्चार्ज ओम डोलारे ,समुपदेशशीका आचल , समुपदेशीका प्रियंका बोरपे ,आरोग्य सेविका छाया कांबळे,आरोग्य सेविका वर्षा गवळे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना डाॅ फुटाणे म्हणाले, नवतरुण पिढीने व्यसनापासून स्वतःला लांबच ठेवावे, अन्यथा अश्या आनेक आजारांचा सामना करावा लागतो .उदगीर येथील आनंद व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डाॅ राजकुमार गवळे व येथील कर्मचारी वर्ग चांगल्या प्रकारे रुग्णांची काळजी घेवून वेळेवर भोजन व गोळ्या, औषधोपचार करून रुग्णांची सेवा करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!