मातंग समाजाच्या वतीने उदगीरात जन आक्रोश मोर्चा.
उदगीर (एल.पी.उगीले)
मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात मातंग समाज व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने उदगीरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात अण्णाभाऊ साठे पुतळा येथे करण्यात आली, व समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी मयत तानाजी बाबुराव सोनकांबळे उदगीर, मयत आनंद गोतावळे वांजरवाडा ता. जळकोट, परभणी येथील 10 वर्षीय बालिकेवर सामुहिक बलात्कार,मयत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच उदगीर येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास वक्फ बोर्डाने दिलेली स्थगिती तत्काळ उठवून स्मारक बांधावे.या मागण्याचे निवेदन तहसीलदार राम बोरगावकर यांना मोर्चेकर्यांनी दिले . यावेळी पंडित सूर्यवंशी, जवाहरलाल कांबळे, बंटी कसबे, संग्राम अंधारे,राज क्षिरसागर, राजाभाई सुर्यवंशी, संग्राम अंधारे, रविंद्र बेद्रे, पप्पु गायकवाड, बालाजी गवारे, ॲड. व्यंकट कांबळे, प्रा. बिभीषन मद्देवाड, बालाजी रणदिवे, अर्जुन जाधव, तातेराव शिंदे, राजकुमार गंडारे,सतिष कांबळे, बालाजी कांबळे, बंटी कांबळे, देविलाल कांबळे, संजय गायकवाड, टी.जी. गायकवाड, जि.ए.गायकवाड, प्रल्हाद येवरीकर, अरविंद शिंदे, विश्वनाथ गायकवाड, उध्दव शिंदे, पांडुरंग कसबे, नागनाथ वाघमारे, संतोष कांबळे, दयानंद गायकवाड, सुरज कांबळे, महेश धावरे, किरण सुर्यवंशी, करण अंधारे, मारोती गायकवाड, दिपक गायकवाड, वर्षाराणी धावरे, अनिता बिरादार, संदेश कांबळे,नागेश गुंडीले,ऋषी लांडगे,शांतीलाल कांबळे, सतीश चव्हाण, रामेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
