शहरातील भगीरथ राजा नगर भागातील रस्त्यानालीचे बांधकाम रखडले

0
शहरातील भगीरथ राजा नगर भागातील रस्त्यानालीचे बांधकाम रखडले

उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर शहरातील अत्यंत उपेक्षित राहिलेला भूभाग म्हणून भगीरथ राजा नगर परिसर ओळखला जातो. या परिसरातील नागरिकांनी गेल्या कित्येक वर्षापासून शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या दारी मोर्चे काढून, आंदोलन करून, निवेदन देऊन विकासाची मागणी केल्यानंतर विकास सुरू होतोय, असे वाटत असतानाच पुन्हा त्याला खीळ बसली आहे.
शहराच्या जळकोट रोड सह हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांतर्गत रस्ते व नाल्या या मुलभुत सुविधांची कामे केली जात आहेत. परंतु स्थानिक अतिक्रमण हा मुद्दा समोर करून विकास कामांत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचा कांगावा करत, यात सामान्य नागरिकांना डावलून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याचे दिसत आहे.गेल्या नोव्हेंबर,डिसेंबर महिन्या पासून व गेले अनेक दिवसांपासून उदगीर शहरातील ३३ प्रभागातील व शहरालगतच्या, शहरातील भगीरथ राजा नगर, गोविंदशेशी शिंदे नगर निवास, धोंड कॉलनी, कमलेश्वर प्राथमिक व माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय कॉलेज रोड, भगीरथ नगर जळकोट रोड उदगीर, बौद्ध सोसायटी, शिवनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, छत्रपती धर्मवीर संभाजी राजा नगर, म्हाडा कॉलनी भागातील रस्ते व नालीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे नगरपरिषद उदगीरच्या हद्दीतील व हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे मर्जीतील वा जवळच्या नातेवाईकांच्या मजूर सहकारी संस्थेवर व सुशिक्षित बेकार अभियंता, शासकीय, निम शासकीय ठेकेदार, कंत्राटदार, गुत्तेदारांच्या नावावर घेऊन प्रत्यक्षात माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीचे जवळचे बगलबच्चे, नातेवाईक आणि गुंडप्रवृत्तीचे, विविध पोलीस स्थानकात, स्टेशनला नोंद असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड प्रवर्तीचे लोक हे शासकीय, निमशासकीय ठेकेदार, मजूर सहकारी संस्था गुत्तेदार, सुशिक्षित बेकार अभियंता, ठेकेदारांच्या नावावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, उपविभागाकडून, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून, जिल्हा नियोजन कार्यालयाकडून, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलनिसारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद बांधकाम विभागातून प्रशासक, मुख्याधिकारी, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर, जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयाकडून विविध नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था, ठेकेदार, कंत्राटदार, बांधकाम व्यवसायिक कंत्राटदार, सुशिक्षित बेकार अभियंता नोंदणीकृत ठेकेदारांच्या नावावर काही कमिशन देऊन नावावर कामे घेतले जातात. ही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता अर्धवट सोडून दिले जात आहे. विशेष म्हणजे उपरोक्त करण्यात येणारी कामे हे निकृष्ट दर्जाचे, दर्जाहीन आहेत. सदरील रस्ता व नाली कामे, बांधकामे अंदाजपत्रका प्रमाणे न करता थातूर- मातूर व निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत. सदरील कामे प्रभागात व वार्डात सुरू असताना या निमशासकीय, शासकीय ठेकेदार, गुत्तेदारांवर लक्ष ठेवण्याकरिता नगरपरिषदेचा नगर अभियंता, शाखा अभियंता, अधिकारी व कर्मचारी एकदाही येत नाही हे पण विशेष आहे. हे न उलगडणारे गौडबंगाल आहे. याबाबतीत तक्रार करणाऱ्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते. तर काहीजणांना उदगीर शहरात जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली जाते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!