अवलकोंडा येथे सिमेंट बँच खाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; तर पाच वर्षाची चिमुकली गंभीर जखमी
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील अवलकोंडा येथे ग्रामपंचायत कडून 15 व्या वित्त आयोगातून बसवण्यात आलेल्या सिमेंट बेंच खाली सापडून सापडून एका चिमुकलीचा मृत्यू तर दुसरी चिमुकली जखमी झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, आवल कोंडा येथे ग्रामपंचायतच्या वतीने घरासमोरील असलेल्या बेंच जवळ खेळत असताना अंगावर बेंच पडल्याने मोहम्मद युसुफ पठाण वय दोन वर्ष, हा चिमुकला मयत झालाय तर त्याची बहीण हयात युसुफ पठाण वय पाच वर्ष गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी तिला लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. अवलकोंडा ग्रामपंचायत इकडून 15 व्या वित्त आयोगातून गावामध्ये सिमेंट बेंच बसवण्यात आले आहेत, मात्र या बेंचला कोणताही सपोर्ट न देता किंवा बेंचला नट बोल्ट न लावल्याने आपल्या मुलाच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. असा आरोप नातेवाईकांनी ग्रामपंचायतीवर केला आहे. या अगोदर सुद्धा याच सिमेंट बेंच मुळे गावातील एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. मात्र ग्रामपंचायत याकडे लक्ष देण्यास सुद्धा तयार नाही. असाही आरोप केला जात आहे.
