संत ज्ञानेश्वर माऊली प्रा. विद्यालय येथे बलिदान दिनानिमित्त आदरांजली.

0
संत ज्ञानेश्वर माऊली प्रा. विद्यालय येथे बलिदान दिनानिमित्त आदरांजली.

उदगीर (एल.पी.उगीले) येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा स्मृतिदिन, बलिदान दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली .
शाळेत विद्यार्थ्यांना इतिहास या विषयाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने इतिहासातील प्रसिद्ध वक्ते शिक्षक बनशेळकीकर व श्रीमती सरदार यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या व मनोरंजक पूर्ण माहिती देऊन इतिहास या विषयाचा कसा अभ्यास करायचा? त्याचे आयुष्यात काय महत्त्व आहे? हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
आपण स्वतः देशप्रेम ,त्यागाची व समर्पणाची भावना वाढवावी , क्रांतिकारक यांचे कार्य ,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांचे कार्य समजावून सांगितले.
यावेळी विद्यार्थी अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. यावेळी त्यांनी महान क्रांतिकारक,देशासाठी प्राणांची आहुती देणारे, व्यक्तिमत्व फासावर चढणारे भगतसिंग, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद , सुखदेव ,राजगुरू लाला लजपतराय यांच्या जीवनावरील पूर्ण माहिती सांगितली.
यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटूरे , श्रीमती सरदार , मुख्याध्यापिका सौ.जगताप अनिता ,केंद्रप्रमुख शिवदासे व शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक बांधव उपस्थित होते. ते सर्व बनशेळकीकर यांचे राष्ट्रभक्ती व देशप्रेम व क्रांतिकारक वीर भगतसिंग, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद ,क्रांतिकारक सुखदेव,क्रांतिकारक राजगुरू यांची माहिती ऐकून मंत्रमुग्ध झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव गुंडेराव यांनी तर आभार प्रदर्शन विष्णुदास बिरादार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!