लोक न्यायालयात एकुण 140 प्रकरणे तडजोडीने निकाली ; 1कोटी 19लाख 41 हजार 910 रुपये वसुल
उदगीर (एल.पी.उगीले) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ यांच्या सयुक्त विद्दमाने राष्ट्रिय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यात 140 प्रकरणे निकाली निघून 1कोटी 19 लक्ष 41 हजार 910 रुपये वसुली झाली आहे.
लोकन्यायालयात थकित प्रकरणा पैकी 1671 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली, यात तडजोडीत 109 प्रकरणे निकाली निघाली. यात 89लाख 21हजार, 501रुपये वसुल झाली.
वादपुर्व 1872 प्रकरणे ठेवली होती. या पैकी 31 प्रकरण तडजोडीने निकाली निघाली असुन यात 30लक्ष 20हजार 409 रुपये वसुल झाले. अशी एकुण 140 प्रकरणे निकाली निघाली असुन यात 1कोटी19 लक्ष 41 हजार 910 रुपये वसुल झाली आहे.
पाच पॅनल न्या. वाय बी गमे तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक , दिवाणी न्यायाधीश व स्तर, पी. बी. लोखंडे , सह दिवाणी न्यायाधीश क स्तर के.ए. पोवार , दिवाणी न्यायाधीश क.स्तर एन जे चव्हाण, दिवाणी न्यायाधीश क.स्तर न्या. बी. आर .झेंडे तर पॅनल मध्ये ऍड.श्रीमती एस. एन. सूर्यवंशी, ऍड.श्रीमती डी.एस. सोमवंशी , ऍड. पी. बी. पाटील, ऍड. एम. एम. निलेवाड, ऍड. ए. आर. सदानंद यांनी काम पाहिले
कर्मचारी एम एल सुत्राळे ,अधीक्षक पी बी सोनाळे, वरिष्ठ लिपिक ,सिस्टम ऑफिसर वाय बी फड यांनी परिश्रम घेतले.
