मौजे नागलगाव येथे कायदेविषयक माहिती शिबिर संपन्न
उदगीर(एल.पी.उगीले) तालुक्यातील मौजे नागलगाव येथे कायदेविषयक माहिती शिबिर नुकतेच घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड, तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ,प्रमुख मार्गदर्शक पोलीस सहाय्यक निरीक्षक विशाल बहात्तरे, एड. पटेल, एड. अमोलजी तलवाडकर हे उपस्थित होते. यावेळी यांनी गावकऱ्यांना नवीन कायदेविषयक यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अंकुश वाघे यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप व आभार नागलगावचे सरपंच सुभाष राठोड यांनी केले. सदरचा कार्यक्रम ग्राम पंचायत कार्यालय नागलगाव येथे घेण्यात आला.
