कवयित्री वर्षा मुस्कावाड यांना निसर्ग मित्र पुरस्कार प्रदान

0
कवयित्री वर्षा मुस्कावाड यांना निसर्ग मित्र पुरस्कार प्रदान

उदगीर (एल.पी.उगीले)
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धुळे जिल्हा समुह आयोजित वसंत बहार या सदरात आवडीच्या काव्य प्रकारावर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कवयित्री वर्षा मुस्कावाड यांनी आपल्या कवितांचे लेखन केले होते. काव्य प्रकारात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल त्यांना निसर्ग मित्र पुरस्कार सन्मान पत्राने गौरविण्यात आले आहे. परीक्षक म्हणून विनायक पाटील यांनी काम पाहिले आहे ‌.
साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांचे विविध वर्तमानपत्रात लेख, कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्या उत्कृष्ट सूत्रसंचालन, भाषण करतात.
निसर्ग मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रा धनराज बंडे, प्रा ‌ कुमार बंडे, अंबिका पारसेवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील व इतर मान्यवर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!