मातंग समाजावरील अन्याय-आत्याचार विरोधात जशास तसे प्रतिउत्तर देऊ – जवाहरलाल कांबळे

0
मातंग समाजावरील अन्याय-आत्याचार विरोधात जशास तसे प्रतिउत्तर देऊ - जवाहरलाल कांबळे

उदगीर (एल.पी.उगीले) मातंग समाजावर दिवसेंदिवस अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असुन मातंग समाज हा शिस्तप्रिय व कायदा पाळणारा समाज आहे .शासन व प्रशासनाने मातंग समाजावर होत असलेल्या आन्याय, आत्याचाराकडे गांभिर्याने पहावे.यापुढे जर असेच अन्याय होत राहिले तर मातंग समाज जशाच तसे उत्तर देणार असल्याचे मत मातंग समाज आक्रोश मोर्चाचे संयोजक जवाहरलाल कांबळे व्यक्त केले. ते मातंग समाज व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने वतीने उदगीरात जन आक्रोश मोर्चा प्रसंगी बोलत होते.
मयत तानाजी बाबुराव सोनकांबळे, मयत आनंद गोतावळे वांजरवाडा ता. जळकोट. परभणी येथील 10 वर्षीय बालिकेवर सामुहिक बलात्कार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच उदगीर येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास वक्फ बोर्डाने दिलेली स्थगिती तत्काळ उठवून स्मारक बांधावे. या मागणीसाठी उदगीरात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चाची सुरुवात अण्णाभाऊ साठे पुतळा येथे करण्यात आली, व समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.यावेळी
मागण्याचे निवेदन तहसीलदार राम बोरगावकर यांना मोर्चेकर्‍यांनी दिले .
मोर्चा आयोजक जवाहलाल कांबळे, रवींद्र बेद्रे, बालाजी रणदिवे यांच्यासह
बंटी कसबे, संग्राम अंधारे, राज क्षिरसागर, राजाभाई सुर्यवंशी, संग्राम अंधारे, सतीश पाटील, अभिजित पाटील,पप्पु गायकवाड, बालाजी गवारे, व्यंकट कांबळे, प्रा. बिभीषन मद्देवाड, बालाजी रणदिवे, अर्जुन जाधव, तातेराव शिंदे, राजकुमार गंडारे, सतिष कांबळे, बालाजी कांबळे, बंटी कांबळे, देविलाल कांबळे, संजय गायकवाड, टी.जी. गायकवाड, जि.ए. गायकवाड, प्रल्हाद येवरीकर, अरविंद शिंदे, विश्वनाथ गायकवाड, उध्दव शिंदे, पांडुरंग कसबे, नागनाथ वाघमारे, संतोष कांबळे, दयानंद गायकवाड, सुरज कांबळे, महेश धावरे, किरण सुर्यवंशी, करण अंधारे, मारोती गायकवाड, दिपक गायकवाड, वर्षाराणी धावरे, अनिता बिरादार, संदेश कांबळे,नागेश गुंडीले,ऋषी लांडगे,शांतीलाल कांबळे, सतीश चव्हाण रामेश्वर शिंदे बालाजी किसन सुर्यवंशी सुधाकर (किसकिंदा )सूर्यवंशी,शिवाजी वाघमारे,भानुदास कांबळे,हेमंत लाडके,राम मोतीराम
आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!