अपर पोलीस महासंचालक श्री.नवल बजाज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

0
अपर पोलीस महासंचालक श्री.नवल बजाज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

लातूर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकचे अपर पोलीस महासंचालक नवल बजाज हे वार्षिक निरीक्षण व तपासणीसाठी 3 दिवसीय लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्त पोलीस मुख्यालयात पोलीस समारंभ कवायतचे (परेड) आयोजन करण्यात आले होते. समारंभ कवायतचे (परेड) नवल बजाज यांनी निरीक्षण केले.
परेड चे संचालन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सेकंड इन-कमांड, बी. चंद्रकांत रेड्डी, सागर खर्डे, IPS परिविक्षाधीन अधिकारी यांनी केले. पोलीस परेड नंतर लातूर पोलीस दलाकडून मॉब डिसपर्सल, दंगा काबू योजना ची प्रत्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील नवीनच बनविण्यात आलेले “मंथन” मीटिंग हॉल चे उद्घाटन नवल बजाज यांचे हस्ते करण्यात आले.
नवल बजाज यांचे मार्गदर्शनात गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, परीक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सागर खर्डे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, शाखा प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!