संविधानाच्या प्रतीचे शाळा महाविद्यालयातून वितरण,तहसीलदार राम बोरगावकर यांचा स्तुत्य उपक्रम

0
संविधानाच्या प्रतीचे शाळा महाविद्यालयातून वितरण,तहसीलदार राम बोरगावकर यांचा स्तुत्य उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले)
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तहसीलदार राम बोरगावकर यांच्या संकल्पनेतून जागर संविधानाचा अंतर्गत भारतीय संविधान प्रतीचे वितरण शाळा महाविद्यालयातून केले जाणार आहे. संविधानाबद्दल जागृती व्हावे , विद्यार्थ्यांना ज्ञान व माहिती मिळावी व प्रत्येक शाळेत संविधान प्रत असवी, यासाठी संविधान प्रतीचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या तर्फे रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात वितरण केले जाणार आहे. तसेच प्रतिष्ठाच्या वतीने संविधान जागर यात विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा, महाविद्यालयातून केले जाणार आहे. तहसीलदार राम बोरगावकर यांनी संविधान प्रती सुपुर्त केले. यावेळी रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्येवाड, सचिव ज्योती कवडेकर मद्देवाड , महेश मळगे , रसूल पठाण रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे ,नीता मोरे, हनुमंत केंद्रे नागनाथ गुट्टे यांची उपस्थिती होती. संविधानाच्या प्रति शाळा व महाविद्यालयातून वितरीत केल्या जाणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!