आर्य वैश्य महिला महासभा तर्फे जागतिक महिला दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले)
आर्यवैश्य महिला महासभा तर्फे जागतिक महिला दिन साजरी करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेले अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक जाधव,कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे योग शिक्षिका भातांब्रे , आणि आई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वैशालीताई चामे, या लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासभा अध्यक्ष्य सौ. प्रतीक्षा वैभव झरकर यांनी केले. यात आर्यवैश्य महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.जाधव यांनी महिला सशक्तीकरण यावर महिलांशी संवाद साधला. तसेच योगगुरू पुरस्कार प्राप्त भातांब्रे यांनी महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्व पटवून दिले.
आर्यवैश्य समाजात खूप होतकरू महिला आहेत. त्यात श्रीदेवी देबडवार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिवण क्लास घेऊन खूप महिला व मुलीना घडवले, त्यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सविता चिद्रेवर, रेणुका डूबेवार, अपर्णा मुक्कावार, स्वाती डूबेवार, आरती वल्लावार, अनिता कोटगिरे, विद्या गुंडाळे,आरती कोटगिरे, शिल्पा गादेवार, शोभा गादेवार, स्वाती गादेवार, शकुंतला गादेवार, हेमा गादेवार, प्रेमालता गादेवार
सुचिता कामठाने तसेच समाजातील महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सांगता आरती गादेवार ह्यांनी महिलांसाठी रचलेल्या चार ओळींनी झाली. त्यातून त्यानी आभार प्रदर्शन केले.
