शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील श्रीपाल गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.श्रीपाल गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ श्रीपाल गायकवाड, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जगन कराळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ नवनाथ वळेकर, विभाग प्रमुख विलास शिंदे,प्रा नितीन पाटील, प्रा. प्रदीप कोठारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ श्रीपाल गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेची तयारी करताना नियोजन करुन अभ्यास करावे, म्हणजे यश मिळते. इंजिनीअरिंग करताना कोणते कोर्स निवडावे, याबद्दलची माहिती दिली. आज स्पर्धा खूप वाढली आहे. नियमित अभ्यास, सराव केला तरच यश संपादन करता येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, प्रल्हाद येवरीकर, मारोती मारकवाड, विनायक करेवाड, सतीश जगताप, बालाजी कांबळे यांनी सहकार्य केले.
