ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राहक हक्क शिक्षणाची गरज – तहसीलदार गोविंद येरमे
मुरुम, (एल.पी.उगीले) ग्राहकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ग्राहक हक्क शिक्षणाची गरज असून प्रत्येक ग्राहक हा ग्राहक संरक्षण हक्क कायद्याचा विद्यार्थी झाला पाहिजे. ग्राहकांचे हक्क, अधिकार या संदर्भात जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. असे विचार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मांडले.
ग्राहक शिक्षणाच्या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांनी 15 मार्च 1962 रोजी ग्राहक हक्काचा ठळक मुद्दा मांडला.
तसेच भारतामध्ये 1983 च्या ग्राहक चळवळीने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार आणि निवारण मंच उपलब्ध करून देण्यात आला. प्रत्येक ग्राहकांना वस्तू आणि सेवा निवडणे, माहिती घेणे, त्याबद्दल मत मांडणे, तक्रार करणे आणि निवारण करून घेणे असे सहा ग्राहकांचे हक्क ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये नमूद केले आहे. प्रत्येकानी या सहा हक्काचे शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. असेही प्रतिपादन तहसीलदार श्री गोविंद येरमे यांनी केले.
ते येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तहसील कार्यालय उमरगा आणि वाणिज्य मंडळाच्या वतीने ग्राहक दिनानिमित्त एक दिवशीय ग्राहक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री येरमे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी आणि प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले, नायब तहसीलदार अमित भारती, पुरवठा निरीक्षक सचिन बिराजदार यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते ग्राहक पंचायत चे संघटक प्रा हेमंत वडणे यांनी ग्राहकांचे हक्क आणि त्याची होणारी फसवणूक यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि त्यावर केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय समारोपामध्ये प्रमोद कुलकर्णी यांनी ग्राहक हक्कांची होणारी पायमल्ली थांबवण्यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देताना, तरुणांनी या चळवळीत सामील व्हावे. असे आवाहन केले.
कार्यशाळेच्या खुल्या चर्चा मध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी सहभाग घेतला. ग्राहकाच्या समस्या आणि आपण, आपणास आलेले अनुभव, झालेली फसवणूक या विषयावर खुली चर्चा करण्यात आली. यासाठी मान्यवरांनी त्यांच्या शंकां आणि समस्यांचे निरासन केले.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी उमरगा तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारक नागरिक आणि पुरवठादार दुकानदार तसेच विद्यार्थ्यांना एक देश एक शिधा पत्रक याबाबत ई-केवायसी साठी आवाहन करणारी चित्रफित दाखवण्यात आली, आणि आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. यावेळी उमरगा तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, तालुका ग्राहक पंचायतचे संघटक धनराज शिंदे , महिला संघटक अश्विनी जोशी, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिठले, प्राध्यापक,नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रा अक्षता बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ओमप्रकाश पवार यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रा. खंडू मुरळीकर, प्राओमप्रकाश पवार, प्रा राणी बेंबळगे, प्रा.अंजली चव्हाण, वाणिज्य मंडळाचे सचिव श्रीजल पाटील, सहसचिव प्रतीक्षा जाधव, कोषाध्यक्ष ऋतुराज माने, तेजस दांडगे आदींनी परिश्रम घेतले.
