मारहाण करणाऱ्या आरोपींना 1 महिन्याचा कारावास.
लातूर (एल.पी.उगीले) महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपींना प्रथमवर्ग न्यायाधिश, औसा पी. पी. आवटे यांनी एक महिन्याचा कारावास ची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने मारहाण केल्याने जखमी फिर्यादीच्या उपचार कामे दोन हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्याबद्दल अधिक माहिती अशी की, सन 2021 मध्ये शेतातील बाभळीच्या झाडावरून झालेल्या वादामुळे नमूद आरोपींनी पीडित महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. सदर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 28/2021 कलम 325, 323, 504, 506, 34 भादवी प्रमाणे आरोपी नामे
विजयकुमार यादवराव इंजे, दिलीप यादवराव इंजे,मुकिंद दिलीप इंजे,
ज्ञानेश्वर विजयकुमार इंजे.(सर्व रा. याकतपूर तालुका औसा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी पोलीस अंमलदार गिरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा योग्य रितीने तपास करुन तपासात साक्षीदार तपासून भरपूर पुरावे शोधून नमूद आरोपी विरुद्ध सबळ दोषारोप न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
शेतातील बाभळीच्या झाडा वरून झालेल्या वादामुळे नमूद आरोपींनी पीडिताला धमकावत मारहाण व शिवीगाळ केली होती. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारी वरून औसा पोलिस ठाण्यात आरोपी विरेधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस अंमलदार गिरी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती ए एन निळेकर व श्रीमती एमएच रेचवाडे, कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार मर्ढे यांनी काम पाहिले. तर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार गिरी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला आहे.
पीडिता व साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरीत न्या. पी.पी. आवटे यांनी आरोपीला उपरोक्त शिक्षा ठाठावली.
