जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठकीस उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आवाहन.
लातूर (एल.पी.उगीले) आगामी काळातील रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,गुडी पाडवा तसेच रमजान ईद निमित्ताने दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. हॉलमध्ये जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शांतता बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहरातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, गोपनीय शाखेचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत .
लातूर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की, सदर शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हातील सर्व समाजातील नागरिकांनी, तसेच पत्रकार बंधूनी उपस्थित राहावे.
सदर बैठकीमध्ये रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,गुडी पाडवा निर्विघ्नपणे शांततेत पार पाडण्यासंदर्भात चर्चा व उपायोजना करण्यात येणार आहेत. तरी सदर बैठकीस लातूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
