विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर

0
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा - पृथ्वीराज पाटील एकंबेकर

उदगीर (एल पी.उगीले)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. एक दुसऱ्याच्या अडीअडचणी सोडवत असतानाच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अनेक कार्यशाळा, नोकरीची संधी, तज्ञांचे मार्गदर्शन या संदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकते असे विचार युवा नेते पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी व्यक्त केले.
ते विद्यावर्धिनी हायस्कूल येथे संपन्न झालेल्या पालक मेळावा कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक पालकांच्या आपल्या मुला मुलीकडून काही स्वप्न असतात,ते स्वप्नपूर्तीसाठी शाळा ,शिक्षक,पालक हे सर्वच काही प्रमाणात जबाबदार असतात. पालक आपल्या पाल्याची खूप काळजी घेतो, परंतु त्याची मित्र मंडळी, संगती खूप महत्त्वाची आहे. याकडे आपण विशेष लक्ष ठेवले पाहिजे. विद्या वर्धिनी शाळा म्हणजे ज्ञान – विज्ञान – संस्कार देणारी सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी धडपड करणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक, सामाजिक विकास घडविण्याचे अविरतकार्य या शाळेत होत असते. या पालक मेळाव्यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन अनेक समस्यांचे निराकरण केले जाते, म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक शिक्षक संवाद महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा शैक्षणिक आढावा व संस्थे च्या कार्याची माहिती किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुंडेराव पाटील यांनी या पालक मेळाव्यात दिली. इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून आपले मनोगत व्यक्त केले.शाळेच्या प्रगती बद्दल प्लेसमेंट व विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी शिंदे,कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, मुख्याध्यापक राम ढगे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यालयीन प्रमुख डी.पी सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक बी.बी नागरवाड, पालक सदस्य धनराज पाटील, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार वलाकटे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. या क्रमांकाचे प्रास्ताविक बी.बी नागरवाड यांनी केले. सूत्रसंचालन जमील अत्तार तर आभार बंडू पाटील लोणीकर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!