रामनवमी निमित्त उदगीरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0
रामनवमी निमित्त उदगीरमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) येथील श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने व छत्रपती संभाजी महाराज बलिदान सप्ताह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते. यात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात युवा पिढीने पुढाकार घेतला होता.
या रक्तदान शिबिरात डॉ. विद्यासागर अचोले,अशीष अंबरखाने,प्रशांत मांगुळकर,सतीश उस्तुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील, 2025 रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय नवरखेले,आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान करण्याऱ्या सर्वरक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रभू श्रीराम यांचा फोटो देण्यात आला.
रक्तदान यशस्वी करण्यासाठी अमोल निडवदे , संतोष फुलारी, आशिष अंबरखाने,प्रशांत मांगुळकर, अभिजीत पाटील, शुभम लोणीकर, नितीश शिरसे, अजय कबाडे, शुभम सुपारे, किशोर रोडगे,आकाश चव्हाण, गजानन राजुरे, प्रशांत मंमदापुरे, अमोल अनकले, अरविंद शिंदे, सागर बिरादार,परमानंद निलंगे, माधव गोणे,विश्वजीत गायकवाड, अमोल बिरादार, डॉ. विद्यासागर अचोले, दीपक नेत्रगावे, कल्लाप्पा स्वामी, राजेश शेटकार,मुंडकर विशाल,रुपेश तळणकर,रोहीत खरात,कपील म्हेत्रे,किशोर रोडगे आदिने परिश्रम घेतले.
रक्तदान केल्याने, वेळेला रक्त न मिळाल्याने अनेकांचे प्राण गेले, याचे भान ठेवून रक्तदान करण्यासाठी अनेक तरुणांनी यात हिरीरीने पुढाकार घेतला होता. यात या सर्वाचे योगदान आहे, श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यातही असेच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटिल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!