आदर्श युवा समाजसेवक पुरस्काराने सुदर्शन बोराडे सन्मानित

0
आदर्श युवा समाजसेवक पुरस्काराने सुदर्शन बोराडे सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले)
अखिल सोनार समाज प्रतिष्ठान, अंबाजोगाई चा मानाचा आदर्श युवा समाजसेवक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात विश्वकर्मा विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे यांना प्रदान करण्यात आला.
या शानदार सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक राजेशभाऊ पंडीत रेणापूरकर यांनी पंढरपूर येथील आनंदी विनायक मंगल कार्यालय येथे केले होते.
व्यासपीठावर प्रकाशदादा वेदपाठक, सोनार हितकारणी सभा महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष संजयजी मंडलिक नाशिक, त्रंबकेश्वर सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ शहाणे, गोपाळशेठ कुलथे, सातारा समाज अध्यक्ष पाथ्रीकर, नागपूरचे पत्रकार दिनेशजी येवले, बारामतीचे व्होनमाने, गणेशशेठ जोजारे, संतोषजी सोनार,संजयजी तळेकर, राजेंद्रजी पारखे, लोणी येथील दत्तात्रय मैड, अशोककाका मैड, विजयकुमार दिक्षित, मोहनशेठ पोतदार, सोलापूर चे निलेशभैय्या धारशिवकर, रोहिणीताई कस्तुरे आदी उपस्थित होते.
हा शानदार सोहळा पंढरीत आयोजित करून सर्व शाखीय सोनार समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आसल्या बद्दल आयोजक राजेशभाऊ पंडीत रेणापूरकर यांचा पंढरपूर सोनार समाजाच्या वतीने शाल, पुष्पहार, मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
या वेळी संस्था अध्यक्ष अरूणशेठ मंजरतकर, संस्था उपाध्यक्ष संजयशेठ ढाळे, संस्था सहसचिव व भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक काकासाहेब बुराडे, पंढरपूर सोनार समाज अध्यक्ष उमेशभाऊ माळवे,
समाज अध्यक्ष अनिलशेठ ढाळे,प्रसादभैय्या ढाळे,आनंद शहाणे महाराज आदी उपस्थित होते, या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातून सर्व शाखीय सोनार समाज बांधव व भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!