सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 च्या वतीने
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरपरिषद प्रांगण मैदान,उदगीर या ठिकाणी घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वरजी निटूरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, सिद्धेश्वर मुन्ना पाटील , मनोज पुदाले. सुधीर भाऊ भोसले ,मयूर बनसोडे, उदगीर ग्रामीणचे पो. नि. पुजारी, संतोष बिरादार, भास्करजी पाटील , उदय मुंडकर, अंजुम कादरी, कुणाल बागबंदे, रामदासजी माळेगावे, सातबारा मेन्सचे विशाल दाडगे, विजयकुमारजी चवळे, विजयकुमार कप्पिकेरे, डॉ. विद्यासागर आचवले, , दिपक नेत्रगावे,प्रशांत मांगुळकर,राहुल रक्षाळे, मंजुषा कुलकर्णी,दिलीप हणमंते,आशाताई बेंजरगे,विनोद गुरमे,कनिष्क शिंदे, संगीताताई नेत्रगावे,केशव पाटील, यशवंत बिरादार, महेश बिरादार ,बसवराज स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जवळपास 2000 विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील बहुधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी कार्य करत असलेली व एवढे मोठे बक्षीस वितरण करणारी पहिलीच वेळ आहे, यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर, सतीश पाटील मानकीकर, बिपिन जयवंतराव पाटील , बाळासाहेब पाटोदे, प्रशांत जगताप, धनाजी मुळे, परीक्षक म्हणून लाभलेल्या अनिताताई कवठाळे, अशा मडके, स्वप्नाताई पुप्पलवाड , मीनाक्षीताई अंबोरो , रेश्मा ताई देशमाने, काव्या सचिनकुमार सोंत ,मधुमती बिरादार, मंगला पाटील , नीताताई मोरे ,मृदुलाताई पाटील ,दत्तात्रय पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी ,पकोले रणजीत माळेगावे, विदेश पाटील सोमनाथपुरकर, प्रा.मदन पाटील, प्रा. राहुल अतनुरे, डी एस बिरादार , निवृती तिरकुमठे,ज्ञानेश्वर बिरादार, विजय बामणीकर, गणेश मुंडकर, शरद खोंडे , नामदेव सूर्यवंशी, अंकुशजी ताटपले पाटील, बालाजी नादरगे, पंकज कालाणी, अमोल पाटील, बामणे अंकुश,संतोष राठोड, राहुल बिरादार,विक्रम घोगरे,सचिन पाटील, परमेश्वर मोरे,सार्थक केंद्रे, शंकर मोरे, गिरीधर पाटील,दिपक पाटील,गोपाळ पाटील दोरनालीकर, जयंत पाटील,हिमांशु पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण 37 शाळांना व शिक्षक बांधव, मुख्याध्यापक यांचा पण समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
