आरोग्य सहाय्यक सौ. मनोरंजना परगे( लंजिले) ताईंचा सेवापुर्ती सोहळा संपन्न .

0
आरोग्य सहाय्यक सौ. मनोरंजना परगे( लंजिले) ताईंचा सेवापुर्ती सोहळा संपन्न .

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रीमती मनोरंजना व्यंकटराव परगे ( लंजिले) आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. तब्बल 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या प्रित्यर्थ सेवापूर्ती गौरव सोहळा थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर ताजबंद चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद गिरी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती मारोती शिंदे (आरोग्य सहाय्यक) तसेच श्री बुरांडे यांच्या उपस्थितीत व लंजिले कुटुंबातील त्यांचा मुलगा विजय लंजीले ,अजित लंजिले,सूनबाई ज्योती लंजीले , नात पवित्रा ,नातू हर्षद लंजीले व त्यांचे स्नेही, मित्र परिवार, आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आरोग्य केंद्राच्या वतीने मुख्य सत्कारमूर्ती सौ. मनोरंजना परगे (लंजीले ) यांचा भर आहेर व भेटवस्तू देऊन तसेच त्यांचे पती श्री बालाजी लंजिले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी परिचारिका ए.ई.बोके सिस्टर,पोले एस . एस.,यांनी मनोगत व्यक्त केले. परगे (लंजिले) ताईंनी आपल्या मनोगतात सांगितले की, पूर्वीच्या काळी मुलीला शिक्षण कठीण असून ही माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची प्रेरणा दिली, नोकरी करण्यास मुभा दिली. व पुढे परिवाराने ही साथ दिली. त्यामुळे खडतर प्रवासातून मुलांच्या संगोपणा सोबतच मी माझा नोकरीचा हा काळ कर्तव्य निष्ठेने सेवा करून पूर्ण करू शकले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. शरद गिरी यांनी सांगितले की, चांगले कर्तव्य केले की फळ आपोआपच चांगले मिळते. आणि त्याचे उदाहरण म्हणजे लंजिले परिवार आहे. त्यांची मुलं, सुना, पूर्ण परिवार हा याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल त्यांना आनंदीबाई पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आपलं कार्य पूर्ण जीव झोकून केलं. उर्वरित आयुष्य त्यांनी स्वतःसाठी जगाव, परिवारात आनंद घ्यावा. व निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात निळकंठ पाटील , डॉ. शरद करकनाळे, अजित लंजिले त्यांची नातं पवित्रा लंजिले यांनीही मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमास गंगाधर नादरगे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुरांडे यांनी केले तर मनोगत व आभार मारोती शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर ताजबंदचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!