लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत वर्षप्रतिपदा उत्सव साजरा.
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात वर्षप्रतिपदा,हिंदू नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख वक्ते म्हणून बाळाराम बानापुरे तसेच,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाळाराम बानापुरे यांनी वर्षप्रतिपदा,गुढी पाडव्याविषयी माहिती सांगितली तसेच, आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. डॉक्टरांनी हिंदू संघटनयांच्याविषयी केलेल्या महान कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.राष्ट्रिय स्वयंसेवक संघ हे जगातील सर्वात बलाढ्य संघटन आहे.या वर्षी संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.आपणही डॉ.हेडगेवार यांचे आत्मचरित्र वाचावे.अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी या वर्षी संघाच्या सर्व कार्यक्रमात तन,मन, धनाने आपण भाग घ्यावा, व डॉ. हेडगेवारांचे आत्मचरित्र सर्वांनी संग्रही ठेवून वर्षभर त्याचे पारायण करण्याचे आवाहन केले, व सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे यांनी केले तर,आभार सौ.अर्चना सुवर्णकार यांनी केले.
