गुढीपाडव्यानिमित्त कै. दशरथ नकाशे यांच्या स्मरणात पाणपोईचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुढीपाडव्या निमित्त उदागिर बाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात . उन्हाळा असल्यामुळे भाविक भक्तांना पाण्याची सोय व्हावी, व त्यांची तहान भागावी. याकरिता प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सतीश दशरथराव नकाशे यांनी वडील कै.दशरथ नकाशे यांच्या स्मरणात प्रसाद व पाणी वाटपाचे आयोजन केले होते. या पाणपोईचा शुभारंभ उदगीरचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते झाला. उदागीर बाबाचे दर्शन घेणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या पाणपोईचा लाभ घेतला.
