आम्हाला रस्ता द्या अन्यथा, आत्मदहन करू शेतकऱ्याचा इशारा

0
आम्हाला रस्ता द्या अन्यथा, आत्मदहन करू शेतकऱ्याचा इशारा

उदगीर (एल.पी.उगीले)
मौजे चोंडी साठवण तलावात मौजे देऊळवाडी च्या शेतकऱ्याना जाण्यासाठीचा जो रस्ता होता तो रस्ता तलावात गेल्या मुळे शेतकऱ्यांची मोठी गोची होत आहे. गैरसोय होत आहे. परिणामतः शेतकरी वैतागले आहेत.
आज 21 व्या शतकात प्रगतीची उंच शिखरे गाठली असली तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. उदगीर तालुक्यातील आदर्श गाव देऊळवाडी गावाच्या शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने गतवर्षी पिकावलेल्या शेतमालाची रास करणे शक्य झाले नाही. आता रस्ता द्या अन्यथा दि .10/04/2025 रोजी चोंडी साठवण तलाव येथे निवेदनावर स्वाक्षरी करणारे सर्व शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यापूर्वी या शेतकऱ्यांना शेतरस्ता होता,चोंडी साठवण तलाव झाल्या मुळे 50 मीटर रस्ता पाण्यात गेला आहे. शेती कामे करण्यासाठी बैलागाडी वाहने जा ये करता येत नाही.गेल्या दोन वर्षापासून लोकप्रतिनिधी तसेच महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी, ,जिल्हाधिकारी, तहसीलदार या सर्वांकडे कैफियत मांडून, चकरा मारून शेतकरी वैतागले आहेत. पण अद्यापही न्याय मिळाला नाही. अखेर दोन वर्षाच्या लढाई लढून न्याय मिळत नसल्याने आत्महत्या कारण्याशिवाय पर्याय नसल्याने या शेतकऱ्यांच्या जगण्यात अर्थ नाही अशी भावना शेतकऱ्याची झाली आहे.
जिल्हाधिकारी यांनी तत्काळ न्याय द्यावा, अशी माफक अपेक्षा शेतकरी करत आहेत.रयत शेतकरी संघटना अध्यक्ष, प्रकाश केंद्रे,बालजी गुट्टे,संभाजी गुट्टे, गुरुराज माळेवाडे, बालाजी गडीकर, विनायक गाडीवर , परमेश्वर, महालिंग माळेवाडे ,धनराज माळेवाड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी रस्ता मिळावा म्हणून आग्रही मागणी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!