मातृ शक्ती हीच विश्व निर्मातीचे केंद्र आहे : आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : विश्वाच्या निर्मितीचा केंद्रबिंदू म्हणून मातृशक्तीकडेच पाहिले जाते. मानवाच्या बाबतीमध्ये आई, पत्नी, मुलगी व बहीण अशा अनेक रूपात स्त्री आपल्या कुटुंबाला पुढे घेवुन जात असते. पुरुषप्रधान कुटुंब पद्धत असताना देखील आपल्या देशातील स्त्रियांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, देत आहेत. अशी ही स्त्री, मातृशक्तीच्या रूपाने विश्वाची निर्मिती करणारी महासत्ता आहे. असे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरित होवून, जगद्गुरु नरेंद्राचार्याजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजीत गुढीपाडवा शोभायात्रा प्रसंगी बोलत होते.
यावेळी सुरेश शिंदे, विजय देशपांडे, तुकाराम गुडले, श्रीदेवी पाटील, अनिल पुदाले,अंकुश आठाणे,सुरज क्षीरसागर, दत्ता मोटे, लासुने, बल्लाळनाथ शिंदे, कृष्णकांत कोंपले, बाळासाहेब पाटोदे, सुभाष चव्हाण, अमोल पांचाळ, भास्कर पाटील, अंतेश्वर पांचाळ, संगिता नागापल्ले, मंगल लासुणे, अरूणा वायगावकर, रेणुका पांचाळ, पद्माजा दिवाण, छबाबाई पांचाळ, शोभा नातेवार, छाया पुदाले, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मराठी नविन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व समाजात वावरत असताना आपल्या माता – भगिनींचा आदर ठेवुन आपण सर्वांनी समाजात वावरले पाहिजे. आपण स्त्रीचा सन्मान केला तरच आपली पुढची पिढी ही सन्मान करत असते असा विश्वास आ.बनसोडे यांनी व्यक्त केला. या शोभायात्रेत सकाळी ७ वाजल्यापासुन गुरु माऊलीच्या सानिध्यात भाविक तल्लीन होवून लेझीम पथक घेवुन गुढी उभारुन, तुलसी कलश डोक्यावर घेवुन भाविक मोठ्या भक्ती भावाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
