सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत
उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागात गुढीपाडवा हा सण प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याचे प्रात्यक्षिक विद्यालयात गुढी उभारून विद्यार्थ्यासमवेत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अर्चना सोलापुरे यांनी अतिशय सुंदर गुढी उभारून पूजेची संपूर्ण तयारी केली होती. त्यामध्ये वेळूची काठी कडुलिंबाचा फाटा, आंब्याची पाने, तांब्याचे कलश, गुढी उभारण्यासाठी काठपदर साडी, फुलाचा हार, साखरेचा हार, नैवेद्य, प्रसाद सर्व साहित्य एकत्रित करून अतिशय सुंदर गुढी उभारली होती. सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं.आशाताई बेंजरगे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी गुढीचे पूजन करून गुढीला नमस्कार केला. गुढीपाडव्याची माहिती सहशिक्षक योगेश चिल्लरगे सरांनी सांगितली. सौं आशा बेंजरगे यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीत “चैत्रशुद्ध प्रतिपदा” हा दिवस महापर्व म्हणून साजरा केला जातो. हिंदू नववर्ष म्हणजे मराठी नूतन वर्षाची सुरुवात आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या भूमितील अतिशय महत्त्वाचा सण आहे. सण, उत्सव इथल्या संस्कृतीचे आणि परंपराचे प्रतीक आहे. अशी सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
