मानव कल्याणासाठी मुस्लिम बांधवाकडुन अल्लाकडे केली प्रार्थना

0
मानव कल्याणासाठी मुस्लिम बांधवाकडुन अल्लाकडे केली प्रार्थना

उदगीर (एल.पी.उगीले) शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी उदगाव मैदानात ईद परमेश्वराकडे प्रार्थना करून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी याचना केली. याप्रसंगी
रमजान ईद निमित्त इदगाह परिसरात राजकिय,सामाजिक कार्यकर्त्यांनी मूस्लीम बांधवाना इदच्या शुभेच्छा ही दिल्या.
पवित्र रमजान महिन्याच्या ईद उल फित्रची नमाज उदगीर येथिल ईदगाह मैदानावर पठण करण्यात आली. या प्रार्थनेत जगात अमन,शांती व बंधुभाव नांदावा व मानव कल्याणासाठी मुस्लीम बांधवानी अल्लाह, ईश्वराकडे प्रार्थना केली.यावेळची नमाज मौलाना मुफ्ती सय्यद मुश्ताक अहमद खतीब यांच्याकडून नमाज पठण व खुतबा दिला. त्यानंतर बयान मौलाना मुफ्ती हम्माद कुरैशी यानी केला. ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकिय नेते,संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, प्रशानातिल अधिकारी उपस्थित होते. यानी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. उपवास करुन नमाज पठन केले जाते. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव हे मानवाच्या कल्याणा साठी अजान पठन करुन अल्हाकडे प्रार्थना करतात. विश्व शांतीसाठी मुस्लीम बांधवाकडुन नमाज पठन करुन मानव कल्याणासाठी प्रार्थना केली गेली.
उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांच्या ‘ईद-उल-फित्र’ कार्यक्रमास मोठयाप्रमाणावर मूस्लीम बांधव ऊपस्थित होते.
यावेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!