रमजान ईद निमित्त आ. संजय बनसोडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

0
रमजान ईद निमित्त आ. संजय बनसोडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

उदगीर (एल.पी.उगीले) : पवित्र रमजान महिन्यात सर्व मुस्लीम बांधवांकडुन उपवास करुन नमाज पठन केले जाते. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव हे मानवाच्या कल्याणा साठी अजान पठन करुन अल्लाह कडे प्रार्थना करतात, उदगीर शहरात सामाजिक सलोखा कायम रहावा, यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी बंधुत्वाची भावना जोपासुन पवित्र रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. विश्व शांतीसाठी मुस्लीम बांधवाकडुन नमाज पठन करुन मानव कल्याणा साठी प्रार्थना केली जाते, असे आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांच्या ‘ईद-उल-फित्र’ कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देताना बोलत होते.
यावेळी इदगाह येथे सय्यद मुस्ताक अहमद खतीब यांनी नमाज़ आणि खुतबा दिला.बयान मुफ्ती हम्माद कुरैशी यांनी केले. यावेळी इदगाह कमेटी चे सय्यद मुजीब अहमद खातीब, समद बागवान, साबेर पटेल,सय्यद खमर इस्लाम, सय्यद एजाज खतीब, भरत चामले, वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, अनिल मुदाळे, श्याम डावळे, श्रीरंग कांबळे, नवनाथ गायकवाड, सनाउल्ला खान, बाळासाहेब मरलापल्ले, शफी हाशमी, शशिकांत बनसोडे, इम्तियाज शेख, अभिजित औटे, जितेंद्र शिंदे, प्रदीप जोंधळे, नरसिंग शिंदे, अतिक शेख, संदिप देशमुख, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, राजकुमार चव्हाण, इब्राहिम नाना पटेल, अखिल मोमीन, अविनाश गायकवाड, देवेंद्र बिरादार, विलास शिंदे, बापू साळुंके, युसुफ बागवान, हिब्जु रहेमान हाशमी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर मतदार संघात मुस्लिम बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असुन या भागातील सर्व समाजाला आपण न्याय दिला आहे. विशेषत: मागील काळात मस्जिद परिसराचे सुशोभिकरण व संरक्षण भिंत, रस्ते, पाणी, वीज आदी सुख सुविधा उपलब्ध करुन देवून या समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मला या समाजाने मदत केली असुन मी कायम आपल्यासोबत खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आ.संजय बनसोडे यांनी दिली. येत्या काळात मुस्लीम समाजाच्या पाठीशी सदैव मी तत्पर असल्याचे सांगितले.यावेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!