डाॅ.मनोज सुकणे एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर तालुक्यातील सुकणी येथील राजकुमार सुकणे यांचा मुलगा मनोज हा एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे. मनोजच्या यशाबद्दल डॉ.उदय भास्कर भोसले, मुख्याध्यापक सदाशिव घोणसे ,कमलाकर मुळे, बिरादार नरसिंग, तलाठी मोरे ,रामकिसन मुळे, रामदास मुळे, चांदोबा सुकणे यांनी डॉ. मनोज व त्यांचे आई -वडीलाचा कुटुंबासह सत्कार केला व डाॅ.मनोजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.