बहुजन विकास अभियानाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा

उदगीर (एल.पी.उगीले) बहुजन विकास अभियानच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. एक महिन्याच्या रोजा नंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या थाटामाटाने रमजान ईद साजरी केली. नमाज अदा झाल्यानंतर बहुजन विकास अभियान पदाधिकाऱ्यांनी सर्व बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन, सर्व जातीपंथाने सुखी समाधानाने जगाव असा संदेश दिला. कारणा देश विविध जातीने नटलेला आहे, विविध परंपरेने नटलेला आहे, त्याचे पालन प्रत्येकजण करत आहेत. ईदच्या निमित्ताने बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण, गंगाधर शेवाळे, अंबादास पाटील, रवी डोंगरे, गोरख वाघमारे, शेख सय्यद आदींनी शुभेच्छा दिल्या.