तहसीलदार राम बोरगावकरांनी केला तांड्याच्या विकासाचा मार्ग मोकळा !स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकारी तांड्यावर !!

0
तहसीलदार राम बोरगावकरांनी केला तांड्याच्या विकासाचा मार्ग मोकळा !स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकारी तांड्यावर !!

उदगीर (एल.पी.उगीले) रस्ता नसल्यामुळे विकासापासून दूर असलेल्या तांड्याला तहसीलदार राम बोरगावकर यांनी भेट देत, तंड्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा केला आहे.स्वातंत्र्यानंतर तांड्यावर पहिल्यांदाच अधिकारी आल्याने विद्यार्थिनींनी तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासमोर मनमोकळे पणाने शिक्षणा सोबतच तांड्याच्या विकासात येणार्‍या समस्यांबद्दल अंत:करण मोकळे करत, पहिली वेळ तहसीलदार तांड्यावर आल्याने समाधान व आनंद व्यक्त केला.
तहसीलदार राम बोरगावकर यांनी नळगीर तांड्याला रस्त्याच्या संदर्भाने भेट दिली . नळगीर पासून नळगीर तांड्यापर्यंतचा रस्ता नकाशावर नसल्यामुळे, त्या रस्त्याचे खडीकरण किंवा बांधकाम करणे शक्य झाले नाही. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी तांड्यावर भेट दिली. यावेळी येथील रहिवाशा सोबतच विद्यार्थींनीनी त्यांच्या विविध समस्यांचा पाढा वाचला .
तांड्यातील आठवी, नववी, दहावी या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी रस्ता नसल्याने शाळेला जाताना- येतांना पावसाळ्यात होणारा त्रास, बऱ्याचदा पावसामुळे किंवा एकटी मुलगी असल्याने तांडा ते नळगीर हे अंतर पार करणे शक्य होत नाही, त्यामुळे शाळेला हजेरी लावता येत नाही. अभ्यास बुडतो, तसेच रस्ता नसल्याने शाळा सोडण्याचीवेळ आनेक विद्यार्थीनीवर आल्याच्या तक्रारी एकून घेत संवेदनशील कर्तव्यदक्ष असलेल्या तहसीलदार बोरगावकर यांनी लागलीच रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याचे अतिक्रमण दूर करणे, आणि रस्ता तयार करणे, या बाबतची कार्यवाही प्रशासनाकडून करण्या संदर्भाने पावले उचलले जाणार असल्याचा विश्वास तांड्यातील नागरिंकांना दिला.त्यामुळे सामाजिक जाणीव व कर्तृत्ववान अधिकारी तहसीलदार राम बोरगावकर यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.
तांड्यातील मुलींना संविधान प्रत भेट !
तांड्यावर असतानाही कठीण प्रसंगावर मात करत विद्यार्थिनी कच्च्या रस्त्यावर पायपीट करत शाळेत ये जा करत असतात, त्यांच्यात शिकण्याची जिद्द पाहूण अधिकारी होण्याची प्रेरणा निर्माण व्हावी,यासाठी
तहसीलदार राम बोरगावकर यांनी संविधानाच्या प्रति तांड्यावरील मुलींना भेट दिली.संविधानाची प्रत हातात पडल्यानंतर विद्यार्थींनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
तहसीलदार राम बोरगावकर यांच्या रुपाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकारी तांड्यावर आल्याने नागरिकातून आनंद व्यक्त केला जात होता.तहसीलदार बोरगावकर यांची कर्तव्य तत्परता पाहुण विद्यार्थीनी प्रभावित झाल्या होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!