प्रहार पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी स्थानिक आमदार निवासस्थाना समोर रात्री बारा वाजता टेंबा (मशाल) आंदोलन करणार
उदगीर (एल.पी.उगीले)
उदगीर व जळकोट तालुक्याचे आमदार महोदय यांच्या निवासस्थाना समोर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव मिळावा यासाठी 11 एप्रिल रोजी रात्री १२.०० वाजता टेंबा (मशाल) आंदोलन करणार असले बाबत उपजिलाधिकारी व संबंधित पोलीस स्टेशन यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार संपुर्ण राज्यभरातील आमदार निवास स्थाना समोर टेंबा आंदोलन केले जात आहे.महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपुर्वी सर्वपक्षीय आमदारांनी त्या त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते. आम्ही निवडुण आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकटानी शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. महाराष्ट्रात सरासरी विचारात घेतल्यास दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगतो आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे.
अशी परिस्थिती असतांना विधान सभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुण आलेले आमदार कर्ज माफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे. एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल हा शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे, शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहेत. तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळी शाल व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याची कर्जमाफी सरकार करत नसल्यांने गळयात निळी शाल, हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेवुन शेतकऱ्यांच्या कर्जामाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा, म्हणुन आमदार महोदयांच्या निवासस्थाना समोर दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.०० वाजता शेतकऱ्यांच्या समस्येचा उजेड सर्व आमदारांना समजुन तो विधानसभेत प्रश्न मांडावा. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन उदगीर तालुक्यातील सर्व प्रहार पदाधिकारी व शेतकरी बांधव यांच्या वतीने उदगीर जळकोट तालुक्याचे आमदार यांच्या निवासस्थानासमोर रात्री ठिक 12 वाजता टेंबा (मशाल) आंदोलन करणार आहोत असे निवेदन प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.सदरील निवेदनावर प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रेमलता भंडे,तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे, कार्याध्यक्ष महादेव आपटे, शहर प्रमुख शाहजान शेख,संघटक सोपान राजे, संपर्क प्रमुख अमित खंदारे, शहर उपाध्यक्ष मौहम्मद चौधरी,सचिव बालाजी बिरादार, कामगार अध्यक्ष शेख मौसा,सरचिटणीस राम स्वामी,प्रसिध्दी प्रमुख अभय कुलकर्णी, संपर्क प्रमुख सुनिल केंद्रे,चिटणीस सुदर्शन सुर्यवंशी, इत्यादी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.
