पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कार्यक्रम शिबिर डोंगरशेळकी येथे संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले)
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष कार्यक्रम शिबीर डोंगरशेळकी ता. उदगीर येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते झाले. या सात दिवसीय शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या ५९ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या शिबिरादरम्यान मोफत पशुरोग निदान व उपचार शिबीरे, जनावरांच्या गोठ्यामध्ये गोचीडनाशक औषधाची फवारणी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, मुरघास निर्मिती, नैसर्गिक शेती व जलसंधारण, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दूध व अंडी यांचे आहारातील महत्व इत्यादी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ. अनिल पाटील, डॉ. अशोक भोसले, डॉ. प्रफुल्ल पाटील, महादेव गोमारे व डॉ. संभाजी चव्हाण यांनी विविध विषयांवर शेतकरी व पशुपालक यांना मार्गदर्शन केले. तसेच या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डोंगरशेळकी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व वरिष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त मदत केली.