बहुजन विकास अभियानाच्या वतीने पुणे येथील दोषी असलेल्या डॉक्टरांच्या चौकशीची मागणी

0
बहुजन विकास अभियानाच्या वतीने पुणे येथील दोषी असलेल्या डॉक्टरांच्या चौकशीची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा केली नाही म्हणून, गर्भवती महिला ईश्वरी भिसे या महिलेचा बळी गेलेला आहे. ही घटना लाजवणारी आहे. याचा जाहीर निषेध बहुजन विकास अभियानाच्या वतीने करून, राज्यांमध्ये पुन्हा अशा पद्धतीने महिलांचा बळी जाऊ नये,या साठी धर्मादाय रुग्णालय सी. एम. कार्यालयाशी जोडण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणात जे दोषी डॉक्टर आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कारण एका निष्पाप महिलेचा बळी त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेलेला आहे. लोक डॉक्टरला देव समजतात, देवाच्या हातून झालेली ही एक हत्या आहे, म्हणून गुन्हेगारांच्याविरुद्ध वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सर्वसामान्य रुग्णांना यापुढे न्याय कसा मिळेल, हे पहावे लागणार आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशाराही बहुजन विकास अभियान च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजेश्वर भाटे, हबीब पठाण, एस एल बी संघटनेचे प्रमुख रामभाऊ शिंदे, बालाजी कारामुंगे, शिवाजीराव शिंदे, भीमराव आळसपुरे, रवी डोंगरे, संजय डोंगापुरे, अमोल सूर्यवंशी, रवी पुडाले, प्रकाश कांबळे, अक्षय सावंत, गोरख वाघमारे, स्वप्नील गोखले, गंगाधर शेवाळे, बालाजी पाटील व महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!