” श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट “तर्फे रामनवमी निमित्त भव्य शोभा यात्रा

0
" श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट "तर्फे रामनवमी निमित्त भव्य शोभा यात्रा

उदगीर (एल.पी.उगीले) श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
भव्य शोभा यात्रेचे उद्घाटन माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे , दिलीप कुमारजी गायकवाड, बस्वराजजी बागवंदे , रामचंद्रजी तिरुके , मनोज दादा पुदाले , बाळासाहेबजी पाटोदे, विजयजी निटुरे , अमोलजी निडवदे , अमोलजी अनकले , संजयजी राठोड , डॉ विद्यासागर अचोले,अशीष अंबरखाने , प्रशांत मांगुळकर , सतीश उस्तुरे ,उद्धव हैबतपुर महाराज शंकरलिंग मठाचे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील, 2025 रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय नवरखेले, आदी मान्यवर उपस्थित होते.
भव्य शोभायात्रा यामध्ये भव्य असे रथ श्रीराम, माता सीता,लक्ष्मण, हनुमान असे देखावे करण्यात आले होते . मर्दानी खेळ दांडपट्टा, तलवार , काठी याची देखावे याचे प्रदर्शन तीन ठिकाणी करण्यात आले.भव्य यात्रेमध्ये घोडे व इतर प्रदर्शन होते, पारंपरिक वाद्य व डीजेच्या तालावर दहा हजाराच्यावर हिंदू बांधवांनी श्रीरामाच्या गाण्यावर ताल धरला होता.
शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी , आशिष अंबरखाने, प्रशांत मांगुळकर, अभिजीत पाटील, संतोष फुलारी , पीयूष चीद्रेवार , डॉ. हर्षवर्धन जाधव , डॉ. प्रशांत राजूरकर,भास्कर पाटिल , दिनेश स्वामी, सावन टंकसाळे, जवाहरलाल कांबळे , पप्पू गायकवाड , राजेश शेटकार ,कलप्पा स्वामी, अरविंद शिंदे , शुभम लोणीकर, नितीश शिरसे, अजय कबाडे, शुभम सुपारे, किशोर रोडगे, आकाश चव्हाण, गजानन राजुरे, प्रशांत मंमदापुरे, अरविंद शिंदे, सागर बिरादार, परमानंद निलंगे, माधव गोणे , अमोल बिरादार, मुंडकर विशाल , माधव रोडगे , गुरुनाथ लदे, माधव गोणे,रुपेश तळणकर,रोहीत खरात,कपील म्हेत्रे , किशोर रोडगे यांच्यासह आदिनी परिश्रम घेतले.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव यांच्यातर्फे पाण्याचे वाटप ‘ छावा संघटना – दता पाटिल तर्फे पाणी वाटप , बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले , आर्य वैश्य यांनी खिचडी वाटप ‘ क्रांती सेना यांनी रसना , सावजी यांनी थंडाई रसना , राहुल शहा यांच्यातर्फे बुंदी वाटप , विमलताई दिनकरराव गर्जे यांच्यातर्फे बिस्कीट वाटप ‘ गिरीश गर्जे हिंगोलीका अंबिका मंदिर येथे खिचडी वाटप , श्रीराम प्रतिष्ठान तर्फे प्रसाद म्हणून दोन क्विंटल खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. व इतरांनीही अनेक अन्नदान वाटप केले. अनेकांनी यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, राजकीय, पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव , सामाजिक संघटना,हिंदू बांधवांनी यामध्ये पुढाकार घेतला. या सर्वानी सहकार्य केले. या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले या सर्वाचे श्रीराम प्रतिष्ठान तर्फे स्वागत करण्यात येते .असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष्य सतीश राजेंद्र पाटिल व श्रीराम नवमी उत्सवाचे 2025 अध्यक्ष अजय नवरखेले यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!