अव्होपाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले)
आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशनच्या वतीने संस्थापक सचिव प्रा. सुनील वट्टमवार यांच्या स्मरणार्थ दि.२७ रोजी रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन अव्होपाच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी नगरेश्वर मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर पारसेवार, अह्वोपाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, अध्यक्ष प्राचार्य संजय चन्नावार, सचिव विजयकुमार गबाळे, कोषाध्यक्ष राकेश पांपट्टीवार, अनिरुद्ध मुक्कावार, अनिल मारमवार, प्रा. संजय संगुळगे, धनंजय गुडसूरकर, व्यंकटेश पारसेवार, सुधाकर पंदीलवार, विठ्ठल बावगे, प्रवीण चंडेगावे, बालाजी जगळपुरे, देविदास पारसेवार, राजेंद्र पेन्सलवार यांनी केले आहे.