कृष्णा पाटील यांचा शास्त्री विद्यालयात सत्कार

उदगीर :(एल.पी.उगिले)येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी कृष्णा बब्रुवान पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन आय ए एस पदाला गवसणी घातली आहे.
कृष्णा पाटीलचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असलेला कृष्णा पाटील यांनी खडतर परिश्रमातून नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 197वा क्रमांक घेऊन यशस्वी ठरल्यामुळे लालबहादूर शास्त्री संकुलाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासुणे , माध्यमिकचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, प्राथमिकचे मुख्याध्यापक अंकुशराव मिरगुडे , बालवाडीच्या अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर, उपमुख्याध्यापक अरुण पत्की व शाळेतील कृष्णा पाटील यांना शिकविलेल्या सर्व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना कृष्णा पाटील भावुक झाला होता.आपल्या यशाचं श्रेय कुटुंबासहित या शाळेला देण्यात येते असे त्यांनी नमूद केले. मी या शाळेत शिकल्याचा मला सार्थ अभिमान आहे. अनेक सत्कारापैंकी माझ्या शाळेने केलेला सत्कार हा माझ्यासाठी अनमोल आहे. असे सांगितले.या सत्कार प्रसंगी कृष्णा पाटील यांचे कुटुंब, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.