शिवसेनेचे पहलगाम हल्याच्या निषेधार्थ लातुरात तीव्र आंदोलन…

लातूर (एल पी उगिले)
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकधार्जिण्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या व गोळीबाराच्या निषेधार्थ शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने गंजगोलाई लातूर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी पाकिस्तान मुडदाबाद , पाकिस्तान जला दो च्या घोषणा देऊन गोलाई दणाणून सोडली. गोलाईत निषेध फेरी काढण्यात आली.मृत पावलेल्या भारतीयांना दोन मिनिट थांबून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच काळ्या फिती बांधून शोक व्यक्त करण्यात आला.दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली असून, तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पाकिस्तान विरोधात शास्त्र कारवाई करावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.प्रत्येक मृत पावलेल्या कुटुंबाच्या दुःखात शिवसेना सोबत असल्याचे व भारतीय सनेने बदला घ्यावा असे शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी भावना व्यक्त केली.यावेळी शिवसैनिक, युवा सैनिक व लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.