हिंदू खाटीक समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध

उदगीर (एल पी उगिले) जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू खाटीक समाजाच्या वतीने अध्यक्ष भानूदास विठ्ठलराव साबणे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर शहरात दहशतवादी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. या हल्ल्यात मयत झालेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजलि अर्पित करण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दहशतवादी पुतळ्याचे दहन केले.
प्रदर्शनात हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष भाणुदास साबणे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. त्यांनी दहशतवादाच्या विरोधात ठाम संदेश दिला आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवून त्यांना समर्थन दिले. “हिंदू समाज एकजूट होऊन या प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करतो,” असे भाणुदास साबणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तसेच, त्यांनी हल्ल्यात मयत झालेल्या पर्यटकांप्रती श्रद्धांजलि अर्पित केली. आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. “दहशतवादाला आता थांबवायला पाहिजे, आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाने एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते, आणि सर्वांनी एकजुटीने या हल्ल्याचा निषेध केला.