टाइम्स पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले) आंतरराष्ट्रीय जीनोम दिनानिमित्त, २५ एप्रिल २०२५ रोजी, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील पशु अनुवंश, पैदास शास्त्र विभाग आणि टाइम्स पब्लिक स्कूल, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने टाइम्स पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीनोम-संबंधित मॉडेल्स सादर करून इयत्ता ७ ते १०वी च्या विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन पर माहिती दिली. सदरील कार्यक्रम हा पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पशु अनुवंश शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय अ. धावारे आणि प्राध्यापक डॉ. प्राजक्ता जाधव यांच्या समन्वयाने पार पडला. यावेळी टाइम्स पब्लिक स्कूलचे प्राचार्य नळगिरकर अभिजित नंदकुमार यांनी आपल्या भाषणात माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागविण्याची क्षमता या उपक्रमात आहे, असे सांगून या स्तुत्य उपक्रमा बद्धल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी टाइम्स पब्लिक स्कूल चे अध्यक्ष ईश्वर प्रसाद बाहेती, सेक्रेटरी विजयकुमार कप्पीकिरे, उप प्राचार्या सौ.शिवकांता शेटकार यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.प्रतिभा शेरीकर आणि नंदकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.