तिर्रट जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल, रोख रक्कम, वाहने, मोबाईल व जुगाराचे साहित्यासह 5 लाख 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

0
तिर्रट जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल, रोख रक्कम, वाहने, मोबाईल व जुगाराचे साहित्यासह 5 लाख 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

लातूर (एल पी उगिले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने अवैध धंद्याच्या विरोधामध्ये मोहीम उघडली असून तिरट जुगार खेळणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल, जुगाराच्या साहित्यासह पाच लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खोरी गल्ली,मित्र नगर परिसरातील एका घराच्या समोर मोकळ्या जागेत छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 10 जणांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकली व मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 5 लाख 89 हजार 30 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यामध्ये इसम नामे अझर महेबुब शेख, (वय 32 वर्ष, राहणार खाडगाव रोड, लातूर),जमीर खाजामिया शेख, (वय 34 वर्ष, राहणार खाडगाव रोड, लातूर), अलफैज रुक्मुद्दीन शेख, (वय 23 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर),समीर अमीर शेख, (वय 32 वर्ष, राहणार खाडगाव रोड, लातूर),अल्तमश अयुब पठाण, (वय 26 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर),सोहेल रसूलशहा बर्फीवाले, (वय 28 वर्ष, राहणार विठ्ठल नगर, लातूर),अरबाज पठाण, (वय 33 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर), बुरहान लायक सय्यद, (वय 36 वर्ष, राहणार नवाब मोहल्ला, लातूर),जैद नसीरखान पठाण, (वय 22 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर), जैद चांद शेख, वय 22 वर्ष, राहणार पटेल चौक लातूर. असे असून पोलीस अंमलदार रियाज सौदागर यांनी दिलेल्या फिर्याद वरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे,पोलिस अमलदार साहेबराव हाके,रियाज सौदागर,मनोज खोसे, नितीन कटारे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!