पशु आरोग्यासाठी एकत्रीत प्रयत्नांची गरज – डॉ अनिल भिकाने

उदगीर (एल पी उगिले) पशुंचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पशुवैद्यक , पशुपालक,संशोधक,पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यकानी एकत्रीतपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन माफसूचे संचालक विस्तार शिक्षण डॉ अनिल भिकाने यानी केले.ते जिव्हाळा ग्रुपच्या वतिने दि २६.४.२०२५ रोजी जागतीक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पशुधन हे निव्वळ मानवी उपजिवीकेचे साधन नसून दुध, अंडी व मांस हे पशुजन्य पदार्थ सुदृढ मानवी आरोग्यसाठी प्रथिनाचा उत्तम स्त्रोत असून अन्न सुरक्षा प्रदान करतात.या पुढील काळात सुरक्षित अन्न पदार्थ निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पशुवैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. असगरअलि शेख, डॉ. वसंत गुळवे, डॉ. अशोक दारनुळे , संचालक डॉ. अनिल भिकाने व उदगीरचे विस्तार अधिकारी डॉ. विजय घोणसीकर यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन जिव्हाळा ग्रुपचे उपाध्यक्ष अशोकराव बिरादार, सहसचिव नवनाथ पाटील,सोपानराव माने,पांडूरंग बोडके,ज्ञानोबा कोटलवार, चंद्रकांत रोडगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिव्हाळा ग्रुपचे नुतन अध्यक्ष दशरथराव शिंदे, माजी अध्यक्ष देविदासराव नादरगे व संस्थापक अध्यक्ष विश्वनाथराव मुडपे यांनी सर्व पशुवैद्यकांना शुभेच्छा दिल्या.
सत्कार मुर्तीनी मनोगतात जिव्हाळा ग्रुपच्या समाजोपयोगी कार्याचा गौरवपुर्वक उल्लेख करून पशुपालकां च्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहू अशी ग्वाही दिली. व सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ अशोक दारनुळे , सुत्र संचालन लक्ष्मिकांत बिडवई तर आभार प्रदर्श़न विश्वनाथराव बिरादार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दशरथ शिंदे व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. माजी अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर, डॉ जैद हामजा सह जिव्हाळा ग्रुप मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.