अंकुश निरगुडे आणि श्याम गौंडगावे, अर्चना सुवर्णकार गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित.

उदगीर (एल पी उगिले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांचा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून तर श्याम गौंडगावे व सौ.अर्चना सुवर्णकार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सन २०२४- २५ सालासाठीचा हा पुरस्कार आहे, लातूर येथील दयानंद कॉलेज सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर तर्फे ‘आदर्श शिक्षक गुरू गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ,सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार, शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, संस्था पदाधिकारी व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.