महापुरुषांच्या विचारांना संकुचित विचारधारेत बांधू नका – राम बोरगावकर

उदगीर (एल पी उगिले) राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या विचारांना गटातटाच्या स्वरूपात समजू नका किंवा त्यांचे विचार संकुचित विचारधारेत बांधू नका असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले. ते मौजे कल्लूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जंयतीमहोत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते.
सकाळच्या सत्रात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन तालूका दंडाधिकारी तथा तहसीलदार राम बोरगावकर यांच्या शुभहस्ते पार पडले . प्रमुख पाहुणे म्हणुन उदगीर ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकूमार पुजारी, पो.नि. राम कुंडगीर , वाढवणा पोलिस स्टेशनचे मोमीन , सरपंच लक्ष्मण कुंडगीर, माजी सरपंच निवृत्ती बाजगीर, नामदेव बिरादार, सुरेश बिरादार, पंढरी सोमासे, जाधव कोंडिबा, जनार्धन जाधव, ज्ञानोबा कांबळे, जयंती महोत्सव समीतीचे अध्यक्ष रामचंद्र सोमासे विचार मंचावर उपस्थीत होते .
याप्रसंगी सौदर्यां सोमासे, आरुषी कांबळे, ममता कांबळे, जयश्री सोमासे, पिऊ शिंदे या विध्यार्थ्यानी मनोगत मानले . प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशिष्ट एका समाजाचे नव्हते तर त्यांचे विचार संपूर्ण जगासाठी आहेत. दलितेत्तर समाजानी बाबासाहेबांना समजून घेतले तर अपेक्षित बदल दिसेल, आपण सर्व मानवजात म्हणुन एक आहोत . प्रत्येक महापुरुषाची जयंती संपूर्ण गावांनी करावी.बौध्द विहारही ज्ञानाची केंद्रे झाली पाहिजेत, डॅा. बाबासाहेबांचे विचार कधीही, कोणीही एका कप्यात बांधू नका, तसेचे सर्वगाव मिळून जंयती करतात याबददल कौतुक केले.याप्रसंगी पो.नि. राजकुमार पुजारी, स.पो.नि. राम कुंडगीर, जमादार मोमीन आदी ने आपले विचार मांडले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे कार्यकारणी सदस्य आदीनी प्रयत्न केले .
या कार्यकृमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा सोमासे, प्रा विष्णुकांत सोमासे यांनी तर प्रस्ताविक प्रा. डॉ. विजयकुमार कलूरकर यांनी केले आभार सुरेश बिरादार गुरुजी यानी मांडले.